महासचिव भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमेटी
श्री. डॉ. चंद्रकांत निंबार्ते यांच्यामते देशातील युवांच्या हाती यशाची गुरुकिल्ली आहे. जनसामन्यातील व्यक्तिमत्व’असलेले श्री. डॉ. चंद्रकांत निंबार्ते नेहमीच तरुणाईला राजकीय प्रवाहात जास्तीतजास्त सामील करण्यासाठी आग्रही राहिले आहेत. ज्यामुळे जुन्या संकल्पना मागे पडून राजकीय प्रगतीला नव्या कल्पनांची झळाळी मिळेल. आपल्या समूहामध्ये त्यांनी प्रामुख्याने स्थानिक युवा व शिक्षण, तंत्रज्ञान आणि व्यवसाय शेतीक्षेत्रातील प्रतिष्ठित शिक्षणतज्ज्ञ, नवोपदेशक आणि विशेषज्ञ ह्यांना महत्व दिला आहे.
भारत हा तरुणांचा देश आहे. देशातील सुमारे ५४ टक्के लोकसंख्या पंचवीसपेक्षा कमी वयाची आहे तर ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ७२ टक्के आहे. आपल्याला लोकशाही अर्थपूर्ण बनवायची असेल तर अधिकाधिक युवकांनी सक्रीय होण्याची आणि निर्णयाच्या आणि बदलाच्या प्रक्रियेत भाग घेण्याची गरज आहे. देशातील युवकांना वाटते की त्यांच्या आकांक्षांनुसार आणि स्वप्नांनुसार देशाने झटपट विकास करावा व प्रगत बनावे. तसे घडण्यासाठी हा मुद्दा समजून युवकांच्या आकांक्षांशी एकरूप होणार्या नेतृत्वाची गरज आहे.
विशेष गुणवत्तेसह बी. ए. एम . एस पदवी मिळविणार्या डॉ. चंद्रकांत नीलकंठ निंबार्ते यांच्याकडे समाजातील विविध परिस्थिति ची समज आहे व आपले हे ज्ञान नैतिक मार्गाने समाजात बदल घडविण्यासाठी वापरण्याची त्यांची क्षमता आहे. या सर्वांमुळे ते कोणत्याही घटनेत आर्थिक, तांत्रिक व मुख्य म्हणजे लोकहिताच्या दृष्टीकोनातून काम करतात.
हाती घेतलेले काम ते तडीस नेतातच आणि ते काम अधिकाधिक चांगल्या रितीने करतात. मदत मागणारा कोणीही असो, दिवसरात्र कोणतीही वेळ असो किंवा आव्हान कितीही कठीण असो, जनतेची सेवा करताना डॉ. चंद्रकांत निंबार्ते जराही बिचकत नाहीत. सर्वसामान्य माणसाच्या भूमिकेत शिरून त्याच्या नजरेतून विचार करणे त्यांना जमते. सर्वसामान्य माणसाच्या मनाचा ठाव घेऊन त्याच्या वेदना समजून घेत त्याच्या समस्येवर तोडगा काढणे हे त्यांचे कौशल्य आहे. अशा रितीने समस्येवर तोडगा काढला की, समोरच्या माणसाच्या चेहर्यावर हसू फुलते.
उच्च शिक्षण असले तरी सदैव जनसामान्यांशी संपर्क ठेवून उत्साहाने लोकाभिमुख कामे करण्याचे त्यांचे वैशिष्ट्य आहे. हाती घेतलेले काम तडीस नेईपर्यंत अथवा समस्या सुटेपर्यंत त्यांना स्वस्थ बसवत नाही. त्यांचे नेतृत्व हे नैतिकतेच्या भक्कम पायावर उभे असलेले पारदर्शी नेतृत्व आहे.
Contact No : 9011 603 999
Email : info@drcnimbarte.com
डॉ. चंद्रकांत निंबार्ते 14 Jan 2020
डॉ. चंद्रकांत निंबार्ते 14 नोवेंबर 2019