साकोली , लाखनी , लाखांदूर या तिन्ही तालुक्यात शैक्षनिक क्षेत्रात विकास व्हावा, सर्व भौतिक सोयी सुविधा प्राप्त व्हाव्यात आणि युवकाांच्या हाताांना रोजगार मिळावे, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आणि समाजातील सर्व घटकाांच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू.
जि. प निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय राष्ट्रीय कााँग्रेस पक्षाच्या वतीने क्षेत्रातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि पक्षाने जर संधी दिली तर ही निवडणूक मी नक्कीच जिंकेन असा विश्वास मी या ठिकाणी आपणास देऊ इछित्तो
सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य, समानता, विविधता आणि न्याय या आदर्शांच्या आधारावर एक सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे. सर्वांना समान संधी उपलब्ध असेल असे स्वतःचा क्षेत्र त्यांना घडवायचे आहे आणि आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी हे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणावर साध्य ही केले आहे.
जगात बदल घडवण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्नही खूप मोठा असतो. आमच्या माणसांवर आमचा विश्वास आहे आणि त्यांनी केलेले सर्व प्रयत्न हे राष्ट्राच्या भल्यासाठीच असतील.श्री. डॉ . चंद्रकांत निंबार्ते यांच्या मते उत्तम शासकाचा जन्म हा तऴागळातल्या जनतेच्या समस्या आणि गरजा जाणून होतो, फक्त मतलबाचे राजकारण करुन होत ऩाही. नागरिकांकडून येणाऱ्या सूचना आणि संकल्पनांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे.
आपल्या कुटुंबाला ज्या समस्यांना सामोरे जावे लागले, त्या सर्व ग्रामीण समस्यांना श्री. डॉ . चंद्रकांत निंबार्ते यांनी प्रथम हात घातला. कारण राजकीय प्रवाहात ग्रामीण जनता विकासापासून नेहमीच वंचित राहते.
या अनुभवातून प्रेरणा घेत त्यांनी सदैव सामाजिक कामासाठी संपूर्ण समाधान शोधत आपली सामाजिक बांधिलकी जपली,असा त्यांचा ठाम विश्वास आहे. ग्रामीण विकासाच्या नव्या विकासकामासाठी ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. परिणामी ग्रामीण भागात दीर्घकाळात विस्तारित वाढ आणि समृद्धी होईल.
समाजकल्याण हा विषय डॉ. चंद्रकांत निंबार्ते यांच्या सर्व धोरणांचा व कृतीचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे हा त्यांच्यासाठी स्वतंत्र विषय नाही. कठोर परिश्रम करणारा समाजकारणी अशी डॉ. चंद्रकांत निंबार्ते यांची ओळख आहे व त्यांच्या सर्व कामांमध्ये त्यांना जनतेचा आशिर्वाद लाभला आहे.
भारत हा तरुणांचा देश आहे. देशातील सुमारे ५४ टक्के लोकसंख्या पंचवीसपेक्षा कमी वयाची आहे तर ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ७२ टक्के आहे. ह्या अनुषंगाने क्षेत्रातील काही उणिवा भरून काढून त्याला पूर्ण स्वरूप द्यायचे माझे उधीष्ट आहे.
उच्च शिक्षण असले तरी सदैव जनसामान्यांशी संपर्क ठेवून उत्साहाने लोकाभिमुख कामे करण्याचे त्यांचे वैशिष्ट्य आहे. हाती घेतलेले काम तडीस नेईपर्यंत अथवा समस्या सुटेपर्यंत त्यांना स्वस्थ बसवत नाही. त्यांचे नेतृत्व हे नैतिकतेच्या भक्कम पायावर उभे असलेले पारदर्शी नेतृत्व आहे.
मी ज्या क्षेत्रामधे वास्तव्यत आहो तिथे लोकांमध्ये गुणवत्ता तर खूप आहे पण क्षेत्रातील अपूर्ण शैक्षणिक विकास त्यामुळे त्यांचा बुद्धिमतेला व कलागुणांना वाव मिळत नाही .माझे पुढील हेच उद्दीष्ट राहणार माझ्या क्षेत्रातील कुणी उच्च शिक्षणापासून व त्यांच्या क्षमतेनुसार जे शिक्षण त्यांना शक्य आहे अश्या शिक्षणापासून वंचित राहता कामा नये.
माझे उद्दीष्ट हेच आहे की शासनाच्या विविध योजना गरजू त्या लोकांकरीता लवकरात लवकर मार्गी लावून त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे.कुटुंब विकास समजाच्या व देशाच्या दृष्टीने एक मूलभूत घटक आहे . क्षेत्राच्या आर्थिक व सामाजिक विकासाच्या दृष्टीकोणातून हे माझे नेहमी प्रयन्त असणार.
वैद्यकीय व्यवसाय साांभाळताना सामाजिक क्षेत्र तसेच राजकीय क्षेत्रात देखील काम सुरू राहिले. डॉक्टर सेलच्या माध्यमातून सोबत खेड्यापाड्याांमध्ये ज्या ठिकाणी आजही एकही डॉक्टर नाही त्या ठिकाणी देखील मोफत सेवा आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून दिली आणि पुढे सुद्धा आरोग्य विषयक वैद्यकीय विकास घडवायचे आहे.
महासचिव
जून 2016
अध्यक्ष
19 मे, 2015
अध्यक्ष
03 January, 2016
अध्यक्ष डॉक्टर सेल
29 January, 2013
सहसचिव
09 April, 2012
मार्गदर्शक
28 June, 2015