GET SUPPORT: INFO@DRCNIMBARTE.COM

एक स्वप्न सर्वसमावेशक समाजाचे

May 30, 2018 comments 10

डॉ. चंद्रकांत निंबार्ते यांच्या व्यक्तिमत्वाची एक हळुवार व संवेदनशील बाजूही आहे. जनतेबरोबर व्यवहार करताना त्यांचा हा पैलू दिसून येतो. सामान्य माणसाच्या वेदना आणि चिंता त्यांना समजतात व ते जनतेची गार्‍हाणी आस्थेवाईकपणे ऐकून घेतात. सर्वसामान्य माणसाच्या भूमिकेत शिरून त्याच्या नजरेतून विचार करणे त्यांना जमते. सर्वसामान्य माणसाच्या मनाचा ठाव घेऊन त्याच्या वेदना समजून घेत त्याच्या समस्येवर तोडगा काढणे हे त्यांचे कौशल्य आहे. अशा रितीने समस्येवर तोडगा काढला की, समोरच्या माणसाच्या चेहर्‍यावर हसू फुलते.

नोकरशाहीचे थर आणि वैयक्तिक लाभाच्या पलिकडे जाऊन सामान्य माणसाच्या गरजांना महत्त्व देण्यासाठी धाडसी निर्णय घेण्याचे श्रेय त्यांना आहे.केवळ बोलघेवडेपणा न करता कृतीवर भर देणारा आणि कधीकधी आधी काम करून मगच त्याबद्दल बोलणारा व्यक्तिमत्व त्यांच्या भाषणातून जनतेला, राजकीय सहकार्‍यांना आणि क्षेत्राला जाणवतो.

कधीकधी तर केवळ काम करा पण त्याची वाच्यता करू नका असेही त्यांचे वागणे असते. कधीही बडेजाव न करणारा हा बी. ए. एम . एस पदवीधर एक शांत, संयमी व धीरोदात्त उदाहरण आहे.

मोकळ्या मनाचा मृदुभाषी नेता. बोलण्यापेक्षा कर्तृत्वावर भर. असे आहेत डॉ. चंद्रकांत निंबार्ते. कोणत्याही कामात स्वतः आघाडीवर रहायचे आणि आपल्या कामाने उदाहरण घालून द्यायचे, अशी त्यांची रीत आहे. विकासाची बीजे रोवायसाठी स्वतः मातीत हात घालण्यात त्यांना कमीपणा वाटत नाही. एखाद्या कार्यक्षम मुख्याधिकार्‍याप्रमाणे आधी केले मग सांगितले हे त्यांचे धोरण आहे.

Leave a Reply

Latest Post

शिवणीबांध जलतरण स्पर्धेतील विधानसभा अध्यक्ष माननीय श्री . नानाभाऊ पटोले ह्यांच्या समवेतिल काही क्षण

डॉ. चंद्रकांत निंबार्ते January 14, 2019

ज्येष्ठ जलतरणपटू ह्यांना प्रोत्साहनपत्र देत असताना

डॉ. चंद्रकांत निंबार्ते January 14, 2019

श्रुष्टि नेचर क्लब आयोजित कार्यक्रमात बक्षिश वितरण करतांना

डॉ. चंद्रकांत निंबार्ते January 14, 2019

श्रुष्टि नेचर क्लब आयोजित कार्यक्रमात सायकल स्पर्धा विजेत्याला बक्षिश वितरण करतांना

डॉ. चंद्रकांत निंबार्ते January 14, 2019

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष श्री. सुनीलजी फुंडे ह्यांना वाढदिवसाच्या सद्दीच्छा देतांना

डॉ. चंद्रकांत निंबार्ते January 14, 2019