गेली अठरा वर्षे वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्ताने अनेक लोकांशी मान्यवरांशी परिचय झाला आणि स्नेहबांध जुळले. वैद्यकीय व्यवसाय सांभाळतांना सामाजिक क्षेत्र तसेच राजकीय क्षेत्रात देखील काम सुरू राहिले. लाखनी तालुका कॉँग्रेसच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष म्हणून गेली पंधरा वर्षे मी काम करत आहे.
डॉक्टर सेलच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्षाच्या सोबत खेड्यापड्यांमद्धे ज्या ठिकाणी आजही एकही डॉक्टर नाही त्या ठिकाणी देखील मोफत सेवा आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून दिली. लाखनी येथील प्रसिद्ध दसरा उत्सव, शिवजन्मोत्सव त्याचबरोबर विविध सामाजिक संस्था आणि कॉंग्रेस पक्षाच्या वतीने होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पक्ष बळकटीसाठी गेली 15 वर्षे काम सुरू आहे.
यादरम्यान पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांशी काम करण्याची संधी भेटली. आमच्या या भागातील लोकांना आरोग्यासोबतच शैक्षणिक सुविधा कशा पुरवता येतील व ग्रामीण भागातील विद्यार्थांना आधार देण्यासाठी शैक्षणिक उपक्रम देखील सुरू केले. या एकूण घडामोडी होत असताना संबंध जिल्हाभर एक नेटवर्क तयार झालां आणि त्याच्या माध्यमातून डॉक्टरांच्या निमा संघटनेचा जिल्हाध्यक्ष झालो.
सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य, समानता, विविधता आणि न्याय या आदर्शांच्या आधारावर एक सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे. सर्वांना समान संधी उपलब्ध असेल असे त्यांचा क्षेत्र त्यांना घडवायचे आहे आणि आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी हे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणावर साध्य ही केले आहे.
30 June 2018 02:00 PM - 09:00 PM
25 July 2018 011:00 PM - 01:00 PM
20 January 2019 11.30:00 Am - 02:00 PM
22 March 2018 02:00 PM - 04:00 PM
आपल्या कुटुंबाला ज्या समस्यांना सामोरे जावे लागले, त्या सर्व ग्रामीण समस्यांना डॉ. चंद्रकांत निंबार्ते यांनी नेहमी हात घातला. कारण राजकीय प्रवाहात ग्रामीण जनता विकासापासून नेहमीच वंचित राहते. या अनुभवातून प्रेरणा घेत त्यांनी सदैव सामाजिक कामासाठी आणि अनेक समस्यांवर संपूर्ण समाधान शोधत आपली सामाजिक बांधिलकी जपली.
उत्तम शासकाचा जन्म हा तऴागळातल्या जनतेच्या समस्या आणि गरजा जाणून घेणे होय , फक्त मतलबाचे राजकारण करुन होत ऩाही. नागरिकांकडून येणाऱ्या सूचना आणि संकल्पनांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. या दोन्ही गोष्टींमुळे त्यांना जनतेच्या सामाजिक-आर्थिक प्राधान्यक्रमांना समजून विविध जनतेची कामे पूर्ण केली. या अनुभवामुळे त्यांना पक्षपातळीवर तसेच संपूर्ण जिल्हा पातळीवर धोरणात्मक उद्दिष्ट निश्चित करण्यास आणि संसाधने लावण्यास मदत झाली.
उच्च शिक्षण असले तरी सदैव जनसामान्यांशी संपर्क ठेवून उत्साहाने लोकाभिमुख कामे करण्याचे त्यांचे वैशिष्ट्य आहे. हाती घेतलेले काम तडीस नेईपर्यंत अथवा समस्या सुटेपर्यंत त्यांना स्वस्थ बसवत नाही. त्यांचे नेतृत्व हे नैतिकतेच्या भक्कम पायावर उभे असलेले पारदर्शी नेतृत्व आहे.
डॉ. चंद्रकांत निंबार्ते यांचा ‘बोले तैसा चाले’ या विचारावर ठाम विश्वास आहे. हाती घेतलेले काम ते तडीस नेतातच आणि ते काम अधिकाधिक चांगल्या रितीने करतात. मदत मागणारा कोणीही असो, दिवसरात्र कोणतीही वेळ असो किंवा आव्हान कितीही कठीण असो, जनतेची सेवा करताना डॉ. चंद्रकांत निंबार्ते जराही बिचकत नाहीत.डॉ. चंद्रकांत निंबार्ते यांच्या व्यक्तिमत्वाची एक हळुवार व संवेदनशील बाजूही आहे. जनतेबरोबर व्यवहार करताना त्यांचा हा पैलू दिसून येतो. सामान्य माणसाच्या वेदना आणि चिंता त्यांना समजतात व ते जनतेची गार्हाणी आस्थेवाईकपणे ऐकून घेतात.सर्वसामान्य माणसाच्या भूमिकेत शिरून त्याच्या नजरेतून विचार करणे त्यांना जमते. सर्वसामान्य माणसाच्या मनाचा ठाव घेऊन त्याच्या वेदना समजून घेत त्याच्या समस्येवर तोडगा काढणे हे त्यांचे कौशल्य आहे.
भारत हा तरुणांचा देश आहे. देशातील सुमारे ५४ टक्के लोकसंख्या पंचवीसपेक्षा कमी वयाची आहे तर ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ७२ टक्के आहे. आपल्याला लोकशाही अर्थपूर्ण बनवायची असेल तर अधिकाधिक युवकांनी सक्रीय होण्याची आणि निर्णयाच्या आणि बदलाच्या प्रक्रियेत भाग घेण्याची गरज आहे.
देशातील युवकांना वाटते की त्यांच्या आकांक्षांनुसार आणि स्वप्नांनुसार आपल्या क्षेत्राने झटपट विकास करावा व प्रगत बनावे. तसे घडण्यासाठी हा मुद्दा समजून युवकांच्या आकांक्षांशी एकरूप होणार्या नेतृत्वाची गरज आहे.
लाखनी तालुका कॉंग्रेस कमेटीच्या वतीने लाखनी तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित करण्यात यावा व इतर मागण्यांचे निवेदन देण्याकरिता तहसील कार्यालय लाखनी येथे जातानी ......
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडेगाव येथे बालक पालक शिक्षक मेळाव्या प्रंसगी उपस्थिती ......
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गराडा येथे शालेय विध्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक साहित्यांचे वाटप करतांना ......